बाभुळगावात उपसरपंच आणि सरपंचाच्या पतिने नाचवल्या नंग्या तलवारी ; तिघांवर जीवघेणा हल्ला - नऊ जणांवर गुन्हा दाखल

बाभुळगावात उपसरपंच आणि सरपंचाच्या पतिने नाचवल्या नंग्या तलवारी ; तिघांवर जीवघेणा हल्ला - नऊ जणांवर गुन्हा दाखल

इंदापूर || व्यापारी गाळ्याच्या जमिनीच्या वादातून बाभूळगांव मध्ये तिघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चौकात बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्याच्या जागेतून हा वाद निर्माण झाला असून गावचे विद्यमान उपसरपंच नागनाथ भिवा गुरगुडे आणि सरपंचाचा पति सोमनाथ शिवाजी जावळे यांसह नऊ जणांनी नंग्या तलवारी नाचवत तिघांवर जीवघेणा हल्ला केला.याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.


दत्तात्रय शहाजी उंबरे वय 34वर्ष रा. बाभुळगांव ता.इंदापूर जिल्हा पुणे यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपी नागनाथ भिवा गुरगुडे, सोमनाथ शिवाजी जावळे,नितिन गोरख भोसले तिघे रा.बाभुळगाव ता.इंदापुर जि. पुणे माऊली दत्तु खबाले रा.भाटनिमगांव, स्वप्निल घोगरे रा. सुरवड,प्रकाश शिंदे रा.अवसरी व अन्य तिन इसमांविरुध्द भा.द.वि.कलम 307,327,324, 504,506 व अन्य कलमांन्वये 11 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दत्तात्रय शहाजी उंबरे यांनी आपल्या फिर्यादी जबाबात म्हटले आहे की,दि.11 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता शेतातून वैरण घेऊन घरी आलो व वैरण टाकून अंगनात बसलो होतो.त्यावेळी वरील आरोपी तिथे आले,त्यांच्या हातामध्ये तलवारी होत्या.त्यावेळी नागनाथ गुरगुडे व सोमनाथ जावळे म्हणाले की, बाभुळगांव चौकातील गाळे आम्हाला दे नाहीतर तुझा मर्डरच करतो.त्यावेळी मी त्यास नकार दिला असता नागनाथ व सोमनाथ यांनी त्यांचे हातातील तलवारीने माझे डोक्यावर मला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वार केला. त्यावेळी मी माझे दोन्ही हात वाचवण्यासाठी वर केले असता तलवारीचे वार माझे दोन्ही हातावर बसून मी खाली पडलो.त्यावेळी भांडणाचा आवाज एकून मला सोडवण्याकरता माझे वडिल शहाजी दशरथ उंबरे व चुलत भाऊ रामचंद्र पोपट उंबरे हे धावून आले. त्यांना नागनाथ व सोमनाथ यांचे सोबत आलेल्या इसमांनी त्यांचे हातातील तलवारीने मारहाण केली. त्यावेळी नितिन भोसले याने माझ्या गळ्यात आसणारी साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन व अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी असे दोन्ही मिळुन 1 लाख 20,000/- रुपयाचा माल ओढुन काढुन घेवुन जात असताना मला तसेच माझे संपुर्ण कुटुंबातील लोकांना जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली,असे फिर्यादीत म्हटले आहे.

माझे बरोबर माझे चुलत भावांनाही जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर मला जास्त मार लागल्याने मी बेशुद्ध पडलो त्यावेळी मला माझे नातेवाईकांनी आणून हाॅस्पीटल येथे अँडमीट केले आहे. सध्या येथे माझेवर उपचार चालू आहेत.असं ही त्यांनी जबाबात म्हटले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे हे करीत आहेत.