अतिक्रमण हटवण्याच्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण स्थगित…

अतिक्रमण हटवण्याच्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण स्थगित…

इंदापूर || वनगळी येथील पाझर तलावावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक रहिवाशी यांनी इंदापूर तालुकाध्यक्ष गुलाब फलफले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि.30 जुलै पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते.मात्र उपविभागीय जलसंधारण अधिकारी,जिल्हा परिषद उपविभाग लघू पाटबंधारे इंदापूर यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आमारण उपोषण स्थगित करण्यात आले.

गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने आम्ही आता आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबीला असल्याचे शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याध्यक्ष पांडुरंग रायते यांनी सांगितले होते.याठिकाणी तालुकाध्यक्ष गुलाब फलफले,ताहेश शेख,शेखर शिंदे,विजय कदम,मंगेश घाडगे,हरिदास पवार,हनुमंत वीर,नामदेव परकाळे,केरदेव लोखंडे,सुदर्शन फलफले,शशिकांत कुंभार,शिवाजी करगळ व हिराराल पारेकर हे आमरण उपोषणाला बसले होते.

या आमरण उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेत वरिष्ठांशी चर्चा करून अतिक्रमण काढणे बाबत पुढील योग्य ती कारवाई पंधरा दिवसात करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

यासोबत उपविभागीय जलसंधारण अधिकारी,जिल्हा परिषद उपविभाग लघू पाटबंधारे इंदापूर यांनी मुबारक कलींदर मुलाणी रा.बिजवडी ता. इंदापूर,जि. पुणे यांना एक लेखी नोटीस काढली असून, वनगळी ता. इंदापुर येथिल पाझर तलावाच्या सांडवा क्षेत्रामध्ये आपण डाळिंबाची लागवड करून तलावाच्या टेल चॅनल (पुच्छ कालवा) मध्ये अतिक्रमण केल्याचे आढळून आले होते. त्या अनुषंगाने या कार्यालयाने उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत आपणास कळविले होते. तथापी आपण आज अखेर पर्यंत सदरचे अतिक्रमण काढले नसल्याचे आढळून आले आहे. सदरची बाब अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे. यापत्राव्दारे आपणास पुनःश कळविणेत येते की, आपण केलेले अतिक्रमण दोन दिवसामध्ये स्वखर्चाने काढून टाकण्यात यावे. अन्यथा सदरचे अतिक्रमण शासकीय खर्चाने काढुन त्यापोटीचा खर्च शासकीय येणे म्हणून आपल्या शेतमिनीच्या उताऱ्यावर बोजा चढविणेत येईल याची गार्भीयाने नोंद घ्यावी असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.