शेतकरी हाच पक्ष समजून राजकारण विरहीत पंचनामे करा - आमदार यशवंत माने 

शेतकरी हाच पक्ष समजून राजकारण विरहीत पंचनामे करा - आमदार यशवंत माने 

मोहोळ दि.23 //मोहोळ विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील सर्वच पिकांचे फळबागाचे तसेच घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले असून त्या सर्वच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करत असताना पक्ष  व राजकारण डोळ्यासमोर न ठेवता केवळ शेतकरी हाच पक्ष आहे असे समजून सर्वाचे पंचनामे करा अश्या सूचना मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शुक्रवार(दि.२३)रोजी शेटफळ व आष्टी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची  पाहणी आमदार यशवंत माने व लोकनेते चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी केली. नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जानून घेतली.कोणताही नुकसानग्रस्त पंचनामा करण्यातून वंचित राहणार नाही. मतदार संघातील सर्व गोष्टींचा मी स्वत: लक्ष घालून आढावा घेत आहे.कोणास कोणतीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा.दरम्यान कोणावरही अन्याय होणार नाही व कोणताही नुकसानग्रस्त पंचनाम्यातून वंचित राहणार नाही यासाठी आमदार माने यांनी वरिल सुचना अधिकारी वर्गाला केल्या आहेत.