निमगांव केतकी उपकेंद्रातून अपुरा वीज पुरवठा मिळत असल्याने शेतकरी संतप्त

निमगांव केतकी उपकेंद्रातून अपुरा वीज पुरवठा मिळत असल्याने शेतकरी संतप्त

इंदापूर || गेल्या एक वर्षापासून निमगांव केतकी उपकेंद्रातून शेतकऱ्यांना शेती साठी थ्री फेज वीज पुरवठा केवळ पाच तासच केला जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी निमगांव केतकी उपकेंद्राच्या अभियंत्याकडे तशी लेखी तक्रार ही केली मात्र याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार दि.12 रोजी  इंदापूर महावितरण उप अभियंता रघुनाथ गोफणे यांपुढे आपल्या समस्यांचा पाढा वाचला. 

पाच तास मिळत असलेल्या विजेच्या कालावधी मध्ये वारंवर ती खंडीत होत असल्याने या उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची शेती पिके अडचणीत आली आहेत. अभियंता रघुनाथ गोफणे यांनी या प्रकरणी लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी सबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.या निवेदनावर विजय हेगडे,प्रवीण भोसले,उत्तम भोंग,सुखदेव बारवकर,संतोष भोसले, सुनिल तळेकर यांसह बावीस शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.