होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…मुख्यमंत्र्याच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…मुख्यमंत्र्याच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

मुंबई || लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. होय, आम्ही तर गेल्या वर्ष भरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची, असं ट्वीट करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला हाणला आहे.

विरोधक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा देत आहेत. मी म्हणतो त्यांनी आता रस्त्यावर जरुर उतरावं. पण कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी’, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना वरील शब्दात टोला लगावला आहे.

फडणवीस ट्विट व्दारे नेमकं काय म्हणालेत…

 • फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…
  पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…
 • हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…
 • डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…
 • ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत !
 • बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…
 • पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…
 • आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…
 • फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…
 • युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…
 • तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा !
 • विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.
 • होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची…