इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर तालुका अध्यक्षपदी डॉ.अविनाश पानबुडे तर सेक्रेटरी पदी डाॅ.बाळासाहेब राऊत

इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर तालुका अध्यक्षपदी डॉ.अविनाश पानबुडे  तर सेक्रेटरी पदी डाॅ.बाळासाहेब राऊत

इंदापूर || इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश पानबुडे(एम.डी.मेडिसिन) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी डॉ. अनिल शिर्के(ऑर्थोपेडिक सर्जन) यांची निवड करण्यात आली. यासोबत सेक्रेटरी या महत्वाच्या पदाचा पदभार डॉ.बाळासाहेब राऊत (ऑर्थोपेडिक सर्जन) यांच्याकडे सोपवण्यात आला तर खजिनदारपदी डॉ.महेश रुपनवर(स्किन स्पेशलिस्ट) यांची निवड करण्यात आली.

हा कार्यक्रम सोमवार दि.19 जुलै रोजी डाॅ.नीतू मांडके आय एम ए हाऊस इंदापूर येथे पार पडला.या कार्यक्रमास अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डाॅ.एम.के.इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ.एम.के.इनामदार म्हणाले,की कोरोना सारख्या महामारित अनेक डाॅक्टरांनी आपल्या जिवाची आहुती दिली पणं अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. हा संघर्ष गेल्या दिड वर्षापासून चालूच आहे.भविष्यात तो कुठपर्यंत चालेल माहित नाही. डाॅक्टर हे देव नाहीत पण नक्कीच ते देवदूत आहेत. गेल्या दिड वर्षात समाजात डाॅक्टर काय भूमिका बजावतो हे अवघ्या विश्वाने पाहिले आहे. त्यामुळे डाॅक्टरांच्या पाठीशी जनतेने पूर्ण ताकदीने उभे राहण्याची गरज आहे. कोणाचा जीव वाचेल याची हमी कोणीच देऊ शकत नाही मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा प्रत्येक जन करत असतो.या लढ्यात सर्वांनी एकोप्याने लढा देण्याची गरज आहे.त्यामुळे एखाद्या मुद्यावर डाॅक्टरांना जबाबदार धरुन चालणार नाही कारण ही लढाई कोणा एका दोघाची नाही हे जनतेने समजण्याची गरज आहे.

इंदापूर तालुक्यात सध्या विविध डाॅक्टर आपल्या रुग्णालयात रुग्णांना उत्कृष्ट दर्जाची सेवा देत आहे. प्रत्येक रुग्ण डाॅक्टरसाठी महत्वाचा असतो. त्याचा  जीव वाचावा म्हणून डाॅक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करित असतात. यात डाॅक्टर म्हणून आम्ही कुठेही कमी पडत नाही.मात्र भविष्यात इंदापूर करांसह सर्व रूग्णांना अतिशय चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याची ग्वाही सर्व डाॅक्टरांच्या वतीने नुतन तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश पानबुडे यांनी दिली.

यावेळी डॉ.संतोष खडतरे उपाध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य, डॉ.लहु कदम (बाल रोग तज्ञ )डॉ.संजय देशमुख (स्त्री रोग तज्ञ)डॉ.नामदेव गार्डे (मा.अध्यक्ष इंदापूर तालुका मेडिकल असोसिएशन) डॉ.शिंदे अध्यक्ष आय.एम.ए.फाउंडेशन, डॉ.मिलिंद खाडे डॉ.समीर मगर,डॉ.मनोज वाघमोडे,डॉ.अमोल रासकर डाॅ.श्रेनिक शहा, डॉ. संजय शहा, डाॅ.आर.आर.शिंदे, डॉ. हेगडे, डाॅ.रेणूरकर, डॉ. दीपक मोरे,डाॅ.सुहास शेळके, डॉ.एकनाथ चंदनशिवे, डॉ.अतुल वनवे,डॉ.मंगेश पाटील,डॉ.राम अरणकर, डाॅ.ज्योती कर्सर डाॅ. बिचकुले डाॅ.अमोल खानावरे, डॉ.दत्ताजी गार्डे,डॉ.ऋषिकेश गार्डे, डॉ.अनिरुद्ध गार्डे,डॉ.शिवाजी खबाले, डाॅ.रोहिदास थोरवे, डॉ. सुधीर तांबिले, डॉ.अभिजीत ठोंबरे आदी उपस्थित होते.