समता सैनिक दल व इंदापूर टायर असोसिएशन कडून महामानवाला अभिवादन

समता सैनिक दल व इंदापूर टायर असोसिएशन कडून महामानवाला अभिवादन

इंदापूर ||  विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ मार्च १९२७ साली स्थापित केलेलं राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटन समता सैनिक दल व इंदापूर शहर आणि परिसरातील टायर व्यवसायिक यांनी एकमताने स्थापन केलेलं संघटन इंदापूर टायर असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने आज संपूर्ण इंदापूर शहरामध्ये १४ एप्रिल या दिनाचे औचित्य साधुन कुळवाडी भुषण शिवछत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, विश्वरत्न, बोधिसत्व प. पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, माता अहिल्यामाई होळकर, साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

संपूर्ण जगामध्ये कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असून महाराष्ट्र शासनाच्या नियमाचे उल्लंघन न करता तंतोतंत पालन करीत हा कार्यक्रम सर्वानुमते प्रमुख कार्यकर्त्याच्या उपस्थितिमध्ये पार पडला.

इंदापूर टायर असोसिएशनचे विषेश सल्लागार आणि समता सैनिक दलाचे विद्यमान पुणे जिल्हा अध्यक्ष आयु. अशोकराव पोळ यांचे हस्ते विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर इंदापूर टायर असोसिएशनचे अध्यक्ष मा. विठ्ठल (नाना) कुलते व इंदापूर टायर असोसिएशनचे खजिनदार रुपेशभाऊ शिंदे यांच्या हस्ते कुळवाडी भूषन शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी समता सैनिक दलाचे जेष्ठ कमांडर  माणिक सुर्यवंशी, कमांडर आयु. महेंद्र सोनवणे, राजाभाऊ सुर्यवंशी तर इंदापूर टायर एसोसिएशनचे सदस्य मा. प्रकाश (तात्या) शिंदे, बापूराव जाधव, एम् डि शकील शेख हे उपस्थित होते.