भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिवादन

इंदापूर || भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानयोगी परिवर्तनाचे अग्रदूत, सामाजिक समतेचे महानायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 130 व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच जेतवन बुद्ध विहार याठिकाणी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्राचा त्यांचा परिपूर्ण अभ्यास होता. दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या अंध:कारमय जीवनात प्रगतीचा उजेड निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक महापुरुष होते, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

याप्रसंगी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शकील सय्यद, आरपीआयचे शिवाजी मखरे, संदिपान कडवळे, गटनेते कैलास कदम, नगरसेवक जगदीश मोहिते, ललेंद्र शिंदे, पांडुरंग शिंदे, नितीन आरडे, सागर गानबोटे, गोरख शिंदे, संतोष देवकर, अक्षय मखरे, हर्षवर्धन कांबळे, सुहास मखरे, मयुर मखरे, नितीन मखरे, गुड्डू मोमीन, रमेश धोत्रे आदी उपस्थित होते.