अंथुर्णे येथे उप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत डिजिटल सातबारा उताऱ्याचे वितरण ; एकाच दिवशी तालुक्यात 47 गावात राबवली योजना

अंथुर्णे येथे उप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत डिजिटल सातबारा उताऱ्याचे वितरण ; एकाच दिवशी तालुक्यात 47 गावात राबवली योजना

इंदापूर || स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षा निमीत्त दि.02 आँक्टोंबर 2021 महात्मा गांधी जयंती पासून सर्व शेतकरी यांना सुधारीत नमुन्यातील डिजीटल स्वाक्षरीत गाव नमुना नं.7/12 मोफत घरपोच वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.इंदापूर तालुक्यातील 47 गावात शनिवार दि.02 आँक्टोंबर पासून याचा शुभारंभ करण्यात आला. 

इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात पुणे उप जिल्हाधिकारी  भाऊसाहेब गलांडे , संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ,तहसीलदार श्रीकांत पाटील,निवासी नायब तहसिलदार अनिल ठोंबरे या मान्यावरांच्या शुभहस्ते व अंथुर्णे ग्रामपंचायतीचे सरपंच लालासाहेब खरात, ग्रामपंचायत सर्व सदस्य, भरणेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आबासाहेब भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात डिजिटल सातबाराचे मोफत वाटप करण्यात आले. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पासून दि.09 आँक्टोंबर पर्यंत तालुक्यातील 141 गावात हा सप्ताह राबवला जाणार असून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सात बारा उतारा वाटप केला जाईल अशी माहिती निवासी नायब तहसिलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.आज एका दिवसात एकूण 47 गावात मिळून 5 ते 6 हजारहुन अधिक सातबारा वाटप केले जातील असेही त्यांनी सांगितले.

शासनाकडून ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या पिकाची नोंदणी करण्यासाठी खास मोबाईल अँपची निर्मिती करण्यात आली आहे. हे अँप गुगल प्ले स्टोअर्स वर उपलब्ध असून अगदी सहज आपल्या मोबाईल मध्ये ते आपण डाउनलोढ करुन हाताळू शकतो.ते वापरण्यास अतिशय सुलभ असून अचूक माहिती आणि ती पण आपल्या थेट शेतातून शेतकऱ्यांना अँपमध्ये भरता येते.  प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईल मध्ये हे अँप डाउनलोढ करुन आपल्या शेतातील पिक पाणीची आँनलाईन नोंद करावी असे आवाहन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले.

दर्म्यान राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील मृत पावलेल्या(कर्ता पुरुष) वारस पत्नीला प्रत्येकी लाभार्थ्यास 20  हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले.  इंदापूर तालुक्यातील 15 लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. अंथुर्णे येथील कार्यक्रम प्रसंगी विठाबाई बबन मोरे,लता संजय कांबळे,सुमन संतोष काळे आणि सुषमा राहुल शिंदे आदी लाभार्थ्यांना उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे , संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ,तहसीलदार श्रीकांत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते सदरील धनादेश वितरीत करण्यात आले.याच सोबत महा-ई सेवा केंद्र,सेतू केंद्र यांच्या मार्फत जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,नाँनक्रिमेलीयर,आर्थिक दुर्बल घटकाचे दाखले उपस्थित मान्यवरांच्या प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.

यावेळी तलाठी मिलिंद हगारे,ग्रामसेवक भागवत, कृषि सहाय्यक ननवरे,कोतवाल खंडु जाधव,पोलीस पाटील बोराटे यांसह गावातील नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी केले. सुत्रसंचालन राहुल साबळे यांनी केले तर आभार निवासी नायब तहसिलदार अनिल ठोंबरे यांनी मानले.