इंदापूरात लोकप्रिय ठरलेले धन्यकुमार गोडसे आता पाहणार या पोलीस ठाण्याचा कारभार…

इंदापूरात लोकप्रिय ठरलेले धन्यकुमार गोडसे आता पाहणार या पोलीस ठाण्याचा कारभार…

इंदापूर || इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सोलापूर ग्रामीण मध्ये बदली करण्यात आली होती. सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र त्यानंतर दि.31 आँगस्ट रोजी त्यांची सातारा जिल्ह्यातील फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवार दि.01 सप्टेंबर रोजी त्यांनी फलटण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.गोडसे यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यात इंदापूर, यवत, चाकण, बारामती, लोणावळा, राजगुरूनगर तर कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष्मीपुरी व पन्हाळा या ठिकाणी सेवा बजावली आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील महाड, माथेरान, श्रीवर्धन व मांडवा या ठिकाणी ही गोडसे यांनी सेवा बजावली आहे.

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील व फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्यरत राहणार असल्याचे धन्यकुमार गोडसे यांनी म्हटले आहे.