त्याचा जीव वाचण्यासाठी अगदी राजवर्धन पाटील यांपासून सर्व धावले ; मात्र …

त्याचा जीव वाचण्यासाठी अगदी राजवर्धन पाटील यांपासून सर्व धावले ; मात्र …

इंदापूर || सध्या कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी कोरोना हद्दपार झालेला नाही. आजही बाधित रुग्णांचा जीव वाचण्यासाठी तीच धरपड आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. सोमवारी घडलेल्या एका घटनेवरुन हे स्पष्ट दिसून येते. बोराटवाडी येथील एका कोरोना बाधित रुग्णांचा जीव वाचण्यासाठी राजकारण्यांपासून सर्वांनीच प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनतेने आजही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी मधिल एक रुग्णावर इंदापूर उपजिल्हा रुगणालयात उपचार सुरू होते.सोमवारी पहाटे त्याची तब्बेच अचानक बिघडली.त्याला व्हेंटिलेटर ची गरज असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी रात्री दोनच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन यांच्याशी संपर्क साधला. राजवर्धन यांनी त्यांना अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल मध्ये अवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिली खरी मात्र रुग्णाचा काही तासातचं इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात मृत्यू झाल्याने त्याचा जीव वाचवण्यात सर्वांनाच अपयश आलं.