इंदापूर क्रीडा संकुलात रंगले क्रिकेटचे सामने ; विविध प्रशासकीय विभागांचा समावेश.

इंदापूर क्रीडा संकुलात रंगले क्रिकेटचे सामने ; विविध प्रशासकीय विभागांचा समावेश.

इंदापूर 07 // इंदापूर तालुका क्रीडा संकुलात प्रशासकीय चषक या क्रिकेट स्पर्धेचे खास आयोजन करण्यात आले आहे.कोरोना महामारीच्या ताणतणावातून मोकळीक मिळण्यासाठी खास प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.पंचायत समितीची गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी  इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले,इंदापूर तालुका क्रीडा शिक्षक अध्यक्ष शरद झोळ, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक वि.टी.जाधव, अंकुश काळेल यांसह सर्व प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते.

२०२० या अखंड वर्षात सर्वच प्रशासकीय विभागांना तारेवरची कसरत करावी लागली. कोरोना अद्याप हद्दपार झाला नसल्याने अद्यापही ती चालूच आहे.अशा गंभीर स्थितीत ताणतणाव दूर होऊन नव्या जोमाने काम करता यावे यासाठी या प्रशासकीय चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र शासन तालुका क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या स्पर्धेत महसूल, पशुसंवर्धन, क्रीडा ,कृषि, पंचायत समिती, नगरपरिषद आदी विभागांसह पत्रकारांनी देखील सहभाग नोंदवत आयोजकांचे कौतुक केले आहे.यात एकूण चौदा टीम सामील झाल्या असून प्रत्येक सामना हा पाच ओव्हर चा असणार आहे.खेळामुळे माणसिक व शारिरिक ताणतणाव दूर होऊन अधिक स्फूर्तीने काम करण्यास मदत होते.गेल्या काही महिन्यांचा सरकारी यंत्रणेवरील ताण पाहता या स्पर्धेतून नक्कीच पुन्हा जोमाने काम करण्याचे बळ कर्मचाऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केली. 

विजयकुमार परीट यांच्या हस्ते नानेफेक करुन सामन्याची सुरवात करण्यात आली. पत्रकार विरूद्ध प्रशासकीय अधिकारी हा सामना रंगला. पत्रकार संघाने प्रथम फलंदाजी करत पाच ओव्हर च्या या सामन्यात  51 धावांचे लक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर ठेवले. फलंदाजी करताना खेळाडू श्रेयश नलवडे यांनी उत्कृष्ट खेळी करत 10 चेंडूत 32 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघाने पाच ओव्हर मध्ये 33 एवढ्याच धावा केल्याने त्यांना पपराभवाचा सामना करावा लागला.दरम्यान पशु संवर्धन अधिकारी डाॅ.शिंदे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.