शिरसोडी येथे सह्याद्री कोविड केअर सेंटर रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज ; ग्रामीण रुग्णांना दिलासा

शिरसोडी येथे सह्याद्री कोविड केअर सेंटर रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज ; ग्रामीण रुग्णांना दिलासा

इंदापूर || डॉ.दत्तात्रय ठोंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर तालुक्यातील शिरसोडी या ठिकाणी ग्रामीण भागात रुग्णांच्या सेवेसाठी सह्याद्री कोवीड केअर सेंटर कार्यान्वित केले असून ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना त्यांच्याच भागात उपचार  मिळावेत या हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले असून ग्रामीण भागातील अशा पद्धतीचे हे पहिलेच आरोग्य केंद्र आहे. 

मंगळवारी दि.18 रोजी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, मा. व्हा. चेअरमन पांडुरंग मारकड, मुंबई मार्केट कमिटी चे मा. संचालक विलास मारकड, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, मा. चेअरमन ज्योतीराम पेटकर, अर्जुन पेटकर, किसन चोरमले, संजय व्यवहारे, गजानन व्यवहारे,किसन शिंदे, सरपंच विजय पोळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ.दत्तात्रेय ठोंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या कोवीड केअर सेंटर मध्ये 10 ऑक्सिजण प्रणालीयुक्त बेड व 20 ऑक्सिजण प्रणाली विरहित बेड अत्यंत अल्प दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. डॉ. दत्तात्रय ठोंबरे,डॉ. मनिषा ठोंबरे, डॉ.स्नेहल कारंडे RMO,डॉ. सचिन थोरवे हे सर्वजण या ठिकाणी सेवा देणार आहेत. हे कोवीड केअर सेंटर उभारणीसाठी शिरसोडी गावाचे मा.सरपंच श्री.पोपट शिंदे व श्री.शत्रुघ्न शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती महेंद्र रेडके यांनी दिली.