कोरोनाचं रौद्ररुप ! पंधरा दिवसात आख्ख कुटुंब संपल

कोरोनाचं रौद्ररुप ! पंधरा दिवसात आख्ख कुटुंब संपल

पुणे || कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात  पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने कोरोनाच्या रौद्ररुपाची स्पष्टता दिसून आलीय. 


एका पूजेच्या निमित्ताने हे सर्व कुटुंब एकत्र आलं होतं. आणि त्यानंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला आणि  एकामागोमाग एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे बळी गेला. या मृत्यूच्या तांडवामुळे जाधव कुटुंबातील कोणीच उरला नाही.

कोरोनाच्या संसर्गमुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीती दायक वातावरण निर्माण झाल आहे.दिवसेंदीवस पुणे शहरात कोरोना स्थिती अधिक गंभीर  होत चालली आहे. प्रत्येक दिवशी रुग्णवाढीचा वेग मोठ्या तीव्रतेने वाढत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पुण्यातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना मज्जाव करण्यात आलायं. याचसोबत नियमित सोसायटीमध्ये येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधणकारक करण्यात आलय, असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.