इंदापूरातील भव्य रक्तदान शिबीरात 157 बँगचे संकलन ; तहसिलदार श्रीकांत पाटील यांसह अनेकांनी केले रक्तदान

इंदापूरातील भव्य रक्तदान शिबीरात 157 बँगचे संकलन ; तहसिलदार श्रीकांत पाटील यांसह अनेकांनी केले रक्तदान

इंदापूर || राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार इंदापूर तालुक्यातील सर्व शासकीय विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शहा संस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 157 बॅगचे संकलन करण्यात आले.

बुधवारी दि.22 रोजी इंदापूर तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते व व्यवसायिक वसंतराव मालुंजकर,नायब तहसिलदार अनिल ठोंबरे,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुहास शेळके, सहाय्यक गटविकास अधिकारी डाॅ.रामचंद्र शिंदे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात इंदापूर तालुक्यातील विविध शासकीय विभाग सहभागी झाले होते.तहसिलदार श्रीकांत पाटील,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुहास शेळके,सहाय्यक गटविकास अधिकारी डाॅ.रामचंद्र शिंदे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे,नायब तहसिलदार अनिल ठोंबरे,उपअधीक्षक भूमी अभिलेख रवींद्र पिसे, गटशिक्षणाधिकारी इंदापूर राजकुमार बामणे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनगर,तलाठी सचिन करगळ यांसह अनेक अधिकारी व कर्मचारी,विविध गावचे पोलिस पाटील यांनी रक्तदान करुन महान कार्यास आपला हातभार लावला.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुनील गावडे, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शह,भिगवन रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे, वरकुटे रोटरीचे अध्यक्ष शशिकांत शेंडे,भिगवनचे नामदेव कुदळे, माळवाडीचे पोलीस पाटील अमोल व्यवहारे,हिंगणगांवचे शरद पाटील,नेताजी मित्र मंडळाचे अध्यक्ष शुभम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या रक्तदान शिबिरासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी कार्यालय मोफत दिले. तर मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर चे अविनाश ननवरे व त्यांचे कर्मचारी यांनी रक्त संकलीत करुन योगदान दिले.