राज्यातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी नागरिकांनी रक्तदान करावे ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

राज्यातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी नागरिकांनी रक्तदान करावे ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

इंदापूर || राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे.शिवाय राज्यातील रक्ताचा तुटवडा ही निर्माण झालाय. हा तुटवडा पाहता इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील 'मुक्ताई ब्लड बँक आणि शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्या माध्यमातून शनिवारी दि.30 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले.

राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.आपण केलेले रक्तदान कोणाला तरी जीवनदान देणार आहे.राज्यावर आणि देशावर आलेले हे संकट पाहता राज्यातील युवापिढीस नागरिकांनी राज्याच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहून रक्तदान चळवळीतून हा तुटवडा भरुन काढावा यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त  रक्तदान असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

यावेळी निमगांव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे,इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्याकुमार गोडसे, डॉ.मिलिंद खाडे यांसह रक्तपेढीचे प्रमुख व कर्मचारी व पक्षाचे पदाधिकारी आणि रक्तदाते उपस्थित होते.