इंदापूरात उसळली झुंबड ; लाॅकडाऊन पूर्वी खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी

इंदापूरात उसळली झुंबड ; लाॅकडाऊन पूर्वी खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी

इंदापूर || लाॅकडाऊन पूर्वी खरेदी करण्यासाठी इंदापूर शहतातील बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उलाल्याचे पहायला मिळाले. प्रशासनाने पूर्वी जाहिर केलेली निर्बंधाच्या नियमावलीत बदल न केल्यामुळे ग्राहकांनी सकाळी सात पासूनचं खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानासमोर तोबा गर्दी केली.

प्रशासनाने ज्या आस्थापना बंद करण्यास सांगितल्या होत्या त्या सुध्दा आस्थापना आज सकाळी उघडण्यात आल्या.आगामी सात दिवसाच्या लाॅकडाऊन पूर्वी भाजीपाला खरेदीसाठी अनेक कुटुंब प्रमुख भाजीपाला विकत घेण्यासाठी घराबाहेर पडले.तसेच शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणि शेतीच्या मशागतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले. या सर्व प्रकारामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला आणि इंदापूरातील सर्व रस्त्यांवर वाहनांसह नागरिकांची तोबा गर्दी झाली.आगामी काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जर वाढली तर त्याला प्रशासन की नागरिक जबाबदार असणार आहेत हाच प्रश्न आज मितीला भेडसावत आहे. 

भाजीपाल्याची चढ्या दराने विक्री …

आगामी सात दिवस लाॅकडाऊन होणार असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येऊ शकत नसल्यामुळे भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी हिरवी मिरची,टोमॅटो,वांगी,कोथिंबीर, लिंबू, यांसह इतर भाज्या व  सफरचंद,चिक्कू,आंबा यांसारखी फळे चढ्या दराने विक्री केल्याचे स्पष्टपणे दिसून आले.