जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला चिंकाराचा मृत्यू ; इंदापूर बारामती रस्त्यावरील घटना

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला चिंकाराचा मृत्यू ; इंदापूर बारामती रस्त्यावरील घटना

इंदापूर || इंदापूर बारामती रोडवर सोनमाथा या परिसरात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच महिने वयाच्या चिंकारा जातीच्या हरणाचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ८ च्या दरम्यान घडली. चिंकारा हा फार दुर्मिळ प्राणी म्हणून गणला जातो,जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला चिंकाराचा मृत्यू झाल्याने प्राणी मित्रांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घटना समजताचं वनविभागाचे कर्मचारी तुकाराम शेंडे यांनी या ठिकाणी धाव घेतलीय. 

या परिसरात रस्त्यावर उतार असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो,अशा स्थितीत अपघात घडण्याची शक्यता अधिक असते.हा परिसर वन्यप्राण्यांचा वास्तव्याचा असून असे अपघात टाळण्यासाठी वनविभागाने या परिसरात जागोजागी सूचना फलक लावावेत.वाहन वेग मर्यादेसह चिंकारा चा नामशेष या फलकांवर करावा अशी मागणी प्राणी मित्रांकडून होत आहे.

या अपघाताची माहिती संदेश भोंग यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब निमगाव केतकीचे अँड.सचिन राऊत यांना दिली.राऊत तात्काळ घटनास्थळी गेले,त्यांनी घडलेला प्रकार वनविभागास कळविला असे अपघात टाळण्यासाठी  वाहनधारकांना ज्यावेळी रोडवरती गाडी चालवतो त्यावेळी जागृत राहून वाहन चालवावे. वन्य प्राणी रोडवर येत असतात, ते दिसल्यानंतर गाडीचा वेग कमी करावा.त्यामुळे  भविष्यकाळात अशा घटना घडणार नाहीत.असे आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब निमगाव केतकी यांच्या वतीने  करण्यात आले आहे.