आता जिंदगी, जान, उसके बाद काम मुख्यमंत्र्यांचे मराठी नाट्य निर्माता आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालकांना आवाहन

आता जिंदगी, जान, उसके बाद काम मुख्यमंत्र्यांचे मराठी नाट्य निर्माता आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालकांना आवाहन

मुंबई || हे बंद करा, ते बंद करा अशी आपली बिलकूल भूमिका नाही. मात्र सध्याची स्थिती पाहता येणाऱ्या भयावह परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल, असे म्हणतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी नाट्य निर्माता, आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालक संघटनेच्या प्रतिनिधीनांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे, विषाणूबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यानंतर या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधीनींही कोरोना रोखण्याच्या शासनाच्या सर्व प्रयत्नांना आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल,असा प्रतिसाद दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.03) रोजी वर्षा या शासकीय निवासस्थानातून मराठी नाट्य निर्माता संघ तसेच त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी आँनलाईन मिटींगव्दारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय आदी सहभागी झाले.

या संवादात सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, अभिनेते सुबोध भावे, उमेश कामत, नाट्य परिषदेचे प्रसाद कांबळी, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी,चित्रपटगृह चालक-मालक संघटनांच्या वतीने निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी, कमल गियान चंदानी, अजय बिजली, नितीन दातार, देवांग संम्पत, कुणाल स्वाहनी, प्रकास चाफळकर, कपिल अग्रवाल, अजय बिजली, सिद्धार्थ जैन, अलोक टंडन, राजेश मिश्रा यांच्यासह मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाशी लढा देताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शासनाची भूमिका आहे.सरकारला तुमच्या व्यवसायाविषयी आत्मीयता आहे, म्हणूनच हा संवाद साधतो आहोत. सध्या स्थिती दिवसेंदीवस बिकट होते आहे. यासाठी कुणाला जबाबदार धरणे, योग्य नाही. जी परिस्थिती आहे ती आता स्वीकारायलाच हवी. आता दोष कुणाचा हे शोधण्याची वेळ नाही तर त्यावर मात कशी करता येईल याला महत्व देण्याची वेळ आहे.मास्क, अंतर राखणे, हात धुणे ही त्रिसूत्री सर्वांनी पाळणे अता अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली असती, तर आजची स्थिती ओढावली नसती. सध्या राज्यात लसीकरण सुरु आहे.या लसीकरणातही आपण सर्वात पुढे आहोत.  केंद्राकडे पाठपुरावा चालू असून अजूनही लस मागत आहोत. पण केंद्रालाही अन्य राज्यांनाही लस द्यावी लागत आहे. राज्यात चोवीस ते  पंचवीस कोटी लसींची आवश्यक आहे. तसा पुरवठा राज्याला होईपर्यंत प्रत्येकाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

आजच्या कोरोना संकटात पूर्ण राज्याचे नुकसान होणार आहे. मात्र जिंदगी, जान उसके बाद काम याप्रमाणे आपल्याला पुढे जावे लागेल. त्यासाठी आता काही पावले उचलण्याची गरज आहे. सध्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे लागतील. यासाठी लोकांमध्ये कोरोनाविषयी जागरुकता निर्माण करावी लागेल. भीती गेली हे चांगले झाले परंतु त्यामुळे बेफिकीरी वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग धोकादायक हे सांगण्याची वेळ आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.यानंतर नितीन दातार म्हणाले, तात्पुरत्या रुग्णालयांसाठी थिएटर्स, त्याठिकाणी असलेली मुबलक जागांमध्ये काही प्रमाणात व्यवस्था उपलब्ध करून देण्याची आमची तयारी आहे. काही ठिकाणी खुर्च्या काढूनही आवश्यकता वाटल्यास व्यवस्था करता येईल. थिएटर्स चालक-मालकांचे सरकारला संपूर्ण सहकार्य लाभेल. 


याचसोबत कमल गियानचंदानी यांनी शासनाला पूर्ण सहकार्य करण्याचा आणि जनतेच्या राज्याच्या हितासाठी जो कोणता निर्णय घ्याल, त्याला पाठिंबा राहील असे आश्वासन दिले. सरकार जो निर्णय घेईल, त्यांच्यासोबत आम्ही एकजुटीने राहू.लॉकडाऊन कुणालाच नको आहे. वेळोवेळी परिस्थितीचे पुनरावलोकनही केले जावे असे रोहित शेट्टी म्हणाले.