कौठळी गावात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी

कौठळी गावात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी

इंदापूर || कौठळी गावात क्रांतीवीर उमाजी नाईक संघटनेच्या वतीने मंगळवारी दि.07 रोजी आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. राज्यावर कोरोनाचे खुप मोठं संकट असल्यामुळे अत्यंत साध्यापणाने ही जयंती साजरी करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे सोशल मिडिया तालुकाध्यक्ष हामा पाटील यांनी सांगितले.

यावेळी हामा पाटील म्हणाले की,क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर) येथे झाला. त्यांचे वडील दादजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी या समाजाकडे सोपविण्यात आली होती.क्रांतीवीर उमाजी नाईक लहानपणापासून वडिलांसोबत पुरंदरच्या रखवालीचे काम करत होते. आपल्या वडिलांकडून त्यांनी गोफण चालविणे, तीरकमठा मारणे, कुऱ्हाड चालविणे, भाला फेकणे, तलवार व दांडपट्टा चालविणे इ.कौशल्ये आत्मसात केली होती.आज असे साहसी खेळ,मर्दानी कला फार कमी लोकांच्या अंगी पहायला मिळतात.उमाजीराजे नाईक हे क्रांतीचा प्रेरणास्त्रोत आहेत,तरूणांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशोपयोगी कार्य करणे गरजेचे आहे.

यावेळी क्रांतीवीर उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष रमेश भंडलकर, उपाध्यक्ष दैवत जाधव, खजिनदार नाना भंडलकर , ह. भ. प.विनायक महाराज जाधव व चंदुलाल भंडलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी उपस्थित अंकुश भंडलकर, दत्तात्रय भंडलकर, भोजलिंग माने,नामदेव पाटील,मल्हारी चव्हाण, राहुल खोमणे,जयभारत जाधव, कुमार भंडलकर,औदुंबर काळेल,साहेबराव जाधव, बारीकराव जाधव,लाला बोडरे, किशोर भंडलकर व ग्रामस्त उपस्थित होते.