जंक्शन येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमाने साजरा

जंक्शन येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमाने साजरा

इंदापूर || भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस जंक्शन येथे सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्त साधून मोहोळकर परीवार व भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा बँकेचे संचालक व इंदापूर मार्केट कमिटीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली व नीरा भीमाचे चेअरमन लालासाहेब पवार,इंदापूर अर्बन बँकेचे संचालक विलास माने,माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवरांच्या  हस्ते केक कापून इंदापूर तालूक्याचे भाग्यविधाते हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती भारतीय जनता पक्ष भ.वी.आ पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी दिली.

यावेळी कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर,बाजार समितीचे संचालक रोहित मोहोळकर,भारतीय जनता पक्ष भ.वी.आ पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे,इंदापूर तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार,अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, सत्यशील पाटील,माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती गायकवाड, प्रताप पाटील,सुरेश कापडी,मोहन दुधाळ, सिध्दार्थ जगताप, सहदेव सरगर,अनील काळे, संतोष लोंढे यांसह शेकडो कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते. रक्तदानासाठी इंडियन रेड क्रॉस ब्लड बॅंकेचे सहकार्य लाभले.