पळसदेव गावचे हद्दीत कार व दुचाकीचा अपघात ; एकाचा मृत्यू

पळसदेव गावचे हद्दीत कार व दुचाकीचा अपघात ; एकाचा मृत्यू

इंदापूर || पळसदेव गावच्या हद्दीत सोलापूर पुणे लेन वर एका चारचाकी कार ने दुचाकीस्वारास मागून धडक दिल्याने या अपघातात पळसदेव येथील संजय शामराव येडे वय 48 वर्षे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.मंगळवार दि. 22 रोजी सकाळी 9 वाजता च्या दरम्यान पळसदेव गावच्या हद्दीत हा अपघात झाला.

संजय येडे हे त्यांच्याकडील दुचाकी वाहन क्रमांक (एम एच 42 ए.व्ही 1936) वरून सोलापूर पुणे लेन ने जात असताना सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या हुंडाई कंपनीच्या कारची (वाहन नंबर एम.एच.12 एस.वाय.5481)  येडेवस्ती बस थांब्या जवळ मागून धडक बसली.या अपघतात  संजय येडे  यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.अशी फिर्याद मयताचे पुतणे विशाल महादेव येडे यांनी इंदापूर पोलिसांत दिली आहे.

त्यानंतर मृत्यूंजय दूत अनिल सदाशिव कुचेकर व प्रवीण सोमनाथ धायगुडे यांनी तातडीने मदत करित खाजगी वाहनातून जखमीस इंदापूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार कामी दाखल केले.मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.त्यानंतर महामार्ग पोलीस केंद्र इंदापूरचे पो.हवालदार नितीन राक्षे, पो.हवालदार संतोष कुंभार,पो.हवालदार भानुदास जगदाळे यांसह महाराष्ट्र सुरक्षा वलाचे कर्मचारी अविनाश बोरसे,विनोद पवार हे दाखल झाले.अपघातातील वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.पुढील तपास पोलीस हवालदार आप्पासाहेब मोरे करीत आहेत.