Breaking इंदापूर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ ; एकाच दिवसात आढळले 43 कोरोना बाधीत.

Breaking इंदापूर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ ; एकाच दिवसात आढळले 43 कोरोना बाधीत.
Covid-19 INDAPUR

इंदापूर ता.25 : इंदापूर तालुका पुन्हा एकदा कोरोनाच्या हाहाकाराने हादरला असून आज दि.25 आँगस्ट रोजी घेण्यात आलेल्या 118 रॅपिड अँटीजन चाचण्यात तब्बल 43 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला असल्याची माहीती आरोग्य विभागातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी ही चिंताजनक बाब असल्याने वाढत्या संसर्गाचा फैलाव रोखणे प्रशासनापुढे आवाहन असणार आहे.

इंदापूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल अशी स्थिती सध्याच्या आकडेवारी वरुन तर पहायला मिळत आहे.आज एकाच दिवसात 43 व्यक्तींची कोरोना चाचणी पाँझिटीव्ह आली असून यात रेडणी येथील 73 वर्षीय एक पुरुष,इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी मधील 40 वर्षीय एक पुर्षीय पुरुष, शेळगांव येथील 34 वर्षीय पुरुष,इंदापूर शहरातील रामदास गल्ली येथील 5 व्यक्ती,माळवाडी नं.२ मधील 7 व्यक्ती,भाटनिमगांव येथील 49 वर्षीय एक महीला,उध्दट येथील 45 वर्षीय पुरुष,इंदापूर शहरातील 2 रुग्ण,अंथुर्णे येथील 3 पुरुष व 1 महीला ,वालचंदनगर येथील 4 पुरुष व 1 महीला, लोणी देवकर येथील 26 वर्षीय एक पुरुष, बळपुडी येथील 30 वर्षीय एक पुरुष,कुरवली येथील 7 व्यक्ती,नरुटवाडी येथील 32 वर्षीय पुरुष आणि इंदापूर मधील 40 वर्षीय महीला यांचा समावेश आहे.मंगल लँब बारामती येथे तपासणी केलेले चार रुग्ण यात इंदापूर शहरातील माळवाडी रोड परिसरातील एक व्यक्ती,बाभुळगांव मधिल एक व्यक्ती,माळेवाडी(पळसदेव) येथील एक व्यक्ती व पवारवाडी मधील एक व्यक्ती असे एकूण 43 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण रुग्ण 548 इतकी झाली असून 24 आँगस्ट च्या माहितीनुसार 314 रुग्ण बरे झाले असून दि.24 आँगस्टपर्यंय 24 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.तर वाढती संख्या पाहता महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे टाळावे.शिवाय मास्क च्या वापरासह सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने पाळावे असे अावाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे