BIG NEWS अखेर इंदापूर तालुक्यातील मुदतसंपलेल्या 52 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती.

BIG NEWS अखेर इंदापूर तालुक्यातील मुदतसंपलेल्या 52 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती.
indapur Panchayat samiti

इंदापूर ता.24 : इंदापूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींचा कालावधी 21 आँगस्ट ते 24 आँगस्ट रोजी संपत असून कोवीड स्थितीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने राज्य सरकारने अशा ग्रामपंचातीवर शासकीय सेवेतील व्यक्तीची पुढील कालावधीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीवर नियुक्ती केलेल्या सदरील शासकीय व्यक्तीने पदभार स्विकारण्याच्या सुचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयष प्रसाद यांनी केल्या आहेत. 

पुणे जिल्हयातील बारामती,भोर,शिरुर,खेड,मुळशी,इंदापूर,मावळ,वेल्हे, जुन्नर या तालुक्यातील दि.21 आँगस्ट ते 24 आँगस्ट 2020 अखेर ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. संदर्भ क्र.1 चा सन 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.10 दिनांक 25 जुन 2020 अन्वये नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणी किंवा युदध किंवा वित्तीय आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचणी किंवा महामारी यामुळे राज्य निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनास राज्यपत्रातील अधिसुचनेव्दारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणुन योग्य व्यक्तीची नियुक्ती करणेबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 151 मधील पोटकलम 1 मध्ये खंड (क) मध्ये तरतुद करण्यात आलेली आहे.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे अधिकार शासन स्तरावर प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने संबंधित जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांना संदर्भ क्र. 2 चे शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आलेले आहेत.सदर अधिकाराचा वापर करुन मी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे, जिल्हयातील खाली नमूद केलेल्या मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने खाली नमुद केलेप्रमाणे प्रशासक यांची नियुक्ती करीत आहे.असे आयुष प्रसाद यांनी दिलेल्या आदेशात म्हटले अाहे. 

त्यानुसार इंदापूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींवर मुदत संपलेल्या तारखेपासून विविध खात्यातील विस्तार अधिकाऱ्यांची  प्रशासक म्हणून नियक्ती करण्यात आली असून यापुढे सदर ग्रामपंचायतींचा कारभार नियुक्त केलेले अधिकारीच पाहतील असे इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. 

यात अनुक्रमे पुढील ग्रामपंचायतींचा समावेश आहे :- पोंधवडी,पळसदेव, चांडगांव, लोणी देवकर,निरवांगी, रुई,बाभूळगांव,भोडणी,भांडगांव, गोंदी, दगडवाडी,नरसिंहपूर,पिंपरी बु.,गिरवी,भावडी, कुंभारगांव, कचरवाडी (बावडा), गोतोंडी, चाकाटी, निमसाखर, टण्णू आदी ग्रामपंचाय तीवर विस्तार अधिकारी (कृषी) पं.स.इंदापूर यांचा कार्यभार असेल. व या मध्ये महादेव भंडलकर,कबीर कदम,हनुमंत बागल हे अधिकारी काम पाहतील. तर रेडा,निमगांव केतकी, बळपुडी,कचरवाडी(नि.के.), काटी, कडबनवाडी, आदी ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी(शिक्षण) पं.स. इंदापूर यांचा कार्यभार असेल. यात राजकुमार बामणे हे अधिकारी काम पाहतील.

चिखली,अंथुर्णे,भरणेवाडी,हगारेवाडी,सरडेवाडी,कळस,तरंगवाडी,तावशी,लासुर्णे,पिटकेश्वर,जाधववाडी,शहा,घोरपडवाडी,जाचकवस्ती,व्याहळी,भादलवाडी,गलांडवाडी नं.१ व २, कौठळी आदी ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी(पंचा) पं.स.इंदापूर यांचा कार्यभार असेल. यात किरण मोरे,प्रशांत बगाडे,बी.डी.वायकर हे अधिकारी काम पाहतील.निंबोडी, अकोले,वरकुटे खुर्द, शेटफळगडे,निरगुडे, पिंपळे आदी ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी(आरोग्य)पं.स. इंदापूर यांचा कार्यभार असेल.यात दिलीप जगताप हे अधिकारी कामकाज पाहणार आहेत.