जेष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावरील अवमानने प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल ; ठोठावला एक रुपये दंड.

जेष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावरील अवमानने प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल ; ठोठावला एक रुपये दंड.
High Cort

नवी दिल्ली । न्यायपालिकेविरुद्ध ट्वीट केल्यामुळे दोषी ठरवण्यात आलेले ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावरील अवमाननेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. याप्रकरणी आज दि.31 आँगस्ट रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने प्रशांत भूषण यांना एक रुपये दंड ठोठावला असून तो 15 सप्टेंबरपर्यंत जमा करायचा आहे.जर तो भरला नाही, तर त्यांना तीन महिने कैद आणि तीन वर्षे प्रॅक्टिसवर बंदीही घातली जाऊ शकते. 

निकालाच्या सुनावण्या अगोदर कोर्टाने म्हटले की, न्यायालयाचा निर्णय हा जनतेचा विश्वास आणि माध्यमांच्या रिपोर्टवरून ठरत नसतो.  कोर्टापूर्वीच प्रशांत भूषण यांनी आपला जबाब माध्यमांमध्ये दिला हे पूर्णपणे चुकीचे आहे.याबाबत त्यांनी माफी मागावी अशी आमची इच्छा होती, परंतु त्यांनी नकार दिला आहे. कोर्टाने म्हटले की, माफी मागण्यात काय चुकीचे आहे? हा शब्द एवढा वाईट आहे? सुनावणी दरम्यान पीठाने भूषण यांना ट्वीटवर पुनर्विचार करून दिलगिरी व्यक्त करण्यासाठी 30 मिनिटांचा अवधीही दिला होता.