ब्रेकिंग || पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळ भीषण अपघात ; जागीच चार ठार

ब्रेकिंग || पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर जवळ भीषण अपघात ; जागीच चार ठार

इंदापूर || पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्गवर इंदापूर पासून दोन किलोमीटर अंतरावर व्यवहारे पेट्रोल पंपानजीक बोलेरो आणि ईरटिका मध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये जागीच चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दुपारी साडेतीन च्या दरम्यान घडला. 

एम.एच.१३ ए.झेड.३९०१ ही महिंद्रा बोलेरो हे वाहन पुण्याकडून सोलापूर कडे निघाली होते यात तीन प्रवासी होते. तर ही इरटीगा कार नंबर एम.एच.४६ बी.ई.४५१५ ही सोलापूर कडून पुण्याकडे भरधाव वेगात निघाली होती, यात एक प्रवासी होता. इंदापूर जवळील व्यवहारे पेट्रोलियम जवळ इरटीगा वाहन हे डिवायडर तोडून बोलेरो गाडीला धडकले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.अपघातातील मृत्यू पावलेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

हा अपघात समजताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस काॅस्टेबल अर्जुन नरळे यांसह सरडेवाडी टोल प्लांझाचे पेट्रोलिंग टीम या ठिकाणी दाखल झाली.चार ही प्रवासी जागीच मयत झाल्याने त्यांचे मयत शव इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात पुढील तजवीज कामी पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान अविनाश बोरसे, विनोद पवार,शिलवंत विंचुरे,अमोल मसुगडे यांसह सरडेवाडी टोल प्लांझाचे राहुल कदम,सलिम सय्यद,रामचंद्र गोफणे,अनिल तरंगे,सचिन सलगर, पप्पु जगताप,प्रदीप काटे,जमीर शेख,तुषार गोसावी, सलमान पठाण  यांनी तात्काळ मदत कार्य करुन वाहतुकीसाठी महमार्ग मोकळा केला.