सणसवाडी जवळील ब्राईट कंपनीला भीषण आग ; घटनास्थळी अग्निशामक यंत्रणा दाखल 

सणसवाडी जवळील ब्राईट कंपनीला भीषण आग ; घटनास्थळी अग्निशामक यंत्रणा दाखल 

शिरुर 20 // शिरूर तालुक्यातील पुणे महामार्गालगत असलेल्या सणसवाडी औद्योगिक परिसरातील एका कंपनीला  सकाळी ११च्या सुमारास भीषण अशी आग लागली आहे.सणसवाडी जवळील एल अँड टी फाटा येथील ब्राईट कंपनीला ही  भीषण आग लागली. आगीने संपूर्ण कंपनीला वेढा घेतला असून घटनास्थळी काळ्या धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत आहेत.

या प्रचंड आशा धुरामुळे आग विझविण्याचा अडथळे येत आहे.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, सदर कंपनीच्या चारही बाजूने अनेक कंपन्या असून त्या कंपन्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://www.facebook.com/watch/?v=860052854542358