अजितदादांच्या उपस्थितीत भाजपाचा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश,पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूकीत भाजपाला धक्का

अजितदादांच्या उपस्थितीत भाजपाचा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश,पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूकीत भाजपाला धक्का

पंढरपूर || पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. सध्या भाजपात असणारे कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून काळे आत  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

गुरूवारी दि. 8 एप्रिल रोजी कल्याणसाव कळे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.  राष्ट्रवादी आणि भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पोट निवडणूकीच्या मैदानात उतरवले आहे.तर भाजपकडून समाधान आवताडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. अशावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिग्गजांकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न केला जात असल्याचे सध्या पाहायला मिळतेय. आणि याच महत्वाच्या वेळी कल्याणराव काळे यांनी भाजपला बायबाय करत राष्ट्रवादीतील प्रवेश केला तर या पोट निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फायदा होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.

अशी आहे कल्याणराव काळे यांची राजकीय कारकीर्द …

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणातील एक मोठं नाव आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते.सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत.त्यांनी सिताराम महाराज साखर कारखान्याची स्थापना केली आहे.श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ही त्यांकडे आहे.सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पद त्यांनी भुषवले आहे.माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदार संघात त्यांचा मोठा जनाधार आहे. कल्याणराव काळे यांचे राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं कामकाज असल्याने त्यांची पंचक्रोशी ओळख आहे.