ब्रेकिंग || दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ब्रेकिंग || दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई || दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहावीची परीक्षा जून महिन्यात, तर बारावीची परीक्षा मे महिन्यात होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिक्षण विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो  विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत  दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.