ब्रेकिंग || शरद पवार पुन्हा रुग्णालयात ; 21 दिवसात पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया

ब्रेकिंग || शरद पवार पुन्हा रुग्णालयात ; 21 दिवसात पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया

मुंबई || राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना काल मंगळवारी दि.20 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या जवळपास 21 दिवसात शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.

30 मार्चला शरद पवारांच्या पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर यापूर्वी शरद पवार यांच्यावर 12 एप्रिलला  पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती.

नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये काय म्हटलयं

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज ट्विट करुन, पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. “आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अँडमिट झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.https://twitter.com/nawabmalikncp/status/1384747960169160704?s=20