ब्रेकींग || गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ; मुख्यमंत्र्यांकडे दिला राजीनामा

ब्रेकींग || गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ; मुख्यमंत्र्यांकडे दिला राजीनामा

मुंबई || गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.

अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर लगेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माझी सीबीआय चौकशी होणार असून त्याआधी मी राजीनामा देत आहे, अशी इच्छ पवारांकडे व्यक्त केली. ते राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे रवाना झाले आहेत आणि मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा स्वीकारतील, असे नवाब मलिक यांनी सांगितले

पत्रकार परिषदेत नवाब मलिक काय म्हणाले …

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असं मलिक म्हणाले.