सरडेवाडी टोल नाक्याजवळ बोलेरो पिक अप पलटली ; सुदैवाने जीवितहानी नाही

सरडेवाडी टोल नाक्याजवळ बोलेरो पिक अप पलटली ; सुदैवाने जीवितहानी नाही

इंदापूर || पुणे सोलापूर राष्ट्रीय राजमार्गावरील सरडेवाडी टोल प्लांझा नजीक असणाऱ्या सर्व्हिस रोड येत असताना चढ न चढल्याने बोलेरो पिक अप दहा ते पंधरा फुट खोलीवर जावून आदळली. हा अपघात आज मंगळवारी दुपारी एक च्या दरम्यान झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सरडेवाडी टोल नाक्या नजीक कोळेकर वस्ती कडे जाणारा मार्ग आहे. एका शेतकऱ्याच्या शेतातून पपई घेऊन ही पिक अप( वाहन नंबर MH 45 AF 0034)येत होती. या कच्चा रस्त्याला पुणे सोलापूर राष्ट्रीय राजमार्गाला लागण्यासाठी मोठा चढ चढावा लागतो.हा चढ चढत असताना सदर वाहन मागे सरकले.चढ चढला न गेल्याने ते दहा ते पंधरा फुट खोलीवर जाऊन आदळले. 

सदर वाहनात आठ ते दहा कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून कोणासही गंभीर दुखापत नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.सरडेवाडी टोल प्लांझाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकामी दाखल करण्यात आले आहे. 

मागील सहा महिन्यापूर्वी ही याच चढावर अशाच पध्दतीने अपघात झाला होता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले त्या वेळी या ठिकाणी रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढवल्यात आली. त्यामुळे कोळेवर वस्ती कडे जाणारा रस्ता खूपच खाली आणि सर्व्हिस रोड खूपच वरती अशी तफावत बनली. त्यामुळे या ठिकाणी मोठा चढ बनला आहे. या ठिकाणी स्थानिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने असे अपघात सतत होत असल्याने भविष्यात मोठा अनर्थ होऊ शकतो.त्यासाठी स्थानिक टोल प्रशासनाने या ठिकाणची परिस्थिती पाहून हा कच्चा रस्ता व सर्व्हिस रोड याचा योग्य तो ताळमेळ बसवून देण्याची मागणी स्थानिक शेतक-यांनी केली आहे.