तालुक्यातील बॉडीबिल्डर्स खेळाडूंना नॅशनल पर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन

तालुक्यातील बॉडीबिल्डर्स खेळाडूंना नॅशनल पर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन

इंदापूर दि.12 // बॉडी बिल्डिंग स्पोर्ट्स आणि फिझिक असोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने व एबीएस जिम इंदापूर आयोजित झालेल्या इंदापूर तालुका लॉकडाऊन ऑनलाईन फेसबुक वर्कआऊट आणि पोझिंग चॅलेंज चा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी वरिष्टाकडून इंदापूर तालुक्यातील बॉडीबिल्डर्स खेळाडूंना नॅशनल पर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन ए.बी.एस.जिमला देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा सचिव शरद मारणे, खजिनदार दिलीप धुमाळ, राष्ट्रीय पंच प्रमोद नाईक, राष्ट्रीय पंच राम बरडे ल,सहसचिव राजेश वायकर हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

माजिदखान रज्जाक पठाण व मेराज हबीब शेख यांच्या  मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळाडूंना प्रोत्साहन आणि सहकार्य करण्यासाठी एबीएस जिम तर्फे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत २० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता.  अजय पौळ हा या स्पर्धेचा मानकरी ठरला.या दोन वर्षात तीन वेळा बॉडी बिल्डिंग स्पर्धा घेऊन इंदापूर तालुका बॉडीबिल्डिंग स्पोर्टस अँड फिझिक असोसिएशन चे सेक्रेटरी मोहसिन शेख यांनी इंदापूर तालुक्यातील मुलांना प्रोत्साहित केले आहे. तसेच आलेले सर्व पदाधिकारी यांनी 6 महिन्यातून एकदा इंदापूर तालुक्यातील बॉडीबिल्डर्स खेळाडूंना नॅशनल पर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच जिल्हा स्तरीय ऑनलाईन स्पर्धा देखिल होणार आहेत. यासाठी मुलांनी तयारीत राहावे आशी महिती एबीएस जिम चे मालक मोहसीन सलीम शेख यांनी दिली आहे.