इंदापूर मधील नेताजीनगर मध्ये रक्तदान व नेत्ररोग तपासणी शिबीर संपंन्न ; 125 युवकांनी केले रक्तदान

इंदापूर मधील नेताजीनगर मध्ये रक्तदान व नेत्ररोग तपासणी शिबीर संपंन्न ;  125 युवकांनी केले रक्तदान

इंदापूर || सामाजिक कार्यकर्ते शुभम पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर मधील नेताजीनगर मध्ये बुधवारी दि.21 जुलै रोजी रक्तदान व नेत्ररोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. इंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या शुभहस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.

सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणाऱ्या या रक्तदान शिबीरात 125 युवकांनी रक्तदान केले.तर एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, महम्मद वाडी, हडपसर, पुणे, यांच्या सहकार्याने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात 76 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 33 नागरिकांची मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे.

याशिवाय गरजू महिलांना साडी वाटप, गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप,वृद्धांसाठी आधार काटीचे वाटप व अनाथ आश्रमात धान्य वाटप यासारखे सामाजिक उपक्रम देखील या निमित्ताने राबवण्यात आले.