उजनीच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी रस्ता रोको,मुंडन करुन नोंदवला सरकारचा निषेध

उजनीच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्यात एकाच वेळी  अनेक ठिकाणी रस्ता रोको,मुंडन करुन नोंदवला सरकारचा निषेध

इंदापूर || इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून मंजूर केलेले पाच टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यानी दबाव आणल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढलेला आदेश रद्द केला.आता यावरून इंदापूर तालुक्यातील शेतकरी व राष्ट्रवादी पदाधिकारी आक्रमक झालेले दिसत आहेत.शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून तालुक्यातील भिगवण मध्ये बारामती - अहमदनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत अनेक जणांनी केले मुंडन करून आदेशाचा निषेध केलाय.यावेळी शेकडोच्या संख्येत उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. इंदापूर - अकलूज रोडवर वडापूरी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

निमसाखर येथे बारामती  निरा नरसिंहपुर रस्ता करण्यात आला. इंदापूर बारामती राज्य महामार्गांवारावर तरंगवाडी येथे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रस्तावर उतरून रास्ता  रोको केला.यावेळी लक्ष्मण झगडे, डॉ. दादाराम झगडे, विजय झगडे,तुकाराम अभंग, सचिन अभंग,नीरज झगडे,गणेश झगडे ,तुकाराम करे, बजरंग राऊत,राजाराम तरंगे,माऊली शिंदे, बापू पोळ, सचिन तरंगे, आप्पा शिंदे, कांतीलाल बुनगे, बापू पारेकर शिवराज गावडे, आजिनाथ तरंगे,अण्णा शेंडगे,कांतीलाल तरंगे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

इंदापूर बारामती रस्त्यावर जंक्शन चौकात पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील व संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात आले. पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतो देत नायं घेतल्याशिवाय राहत नायं, हक्काचं पाणी मिळालेचं पाहिजे,दत्तामामा भरणे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी करण्यात आली.