शिवजन्मोत्सव ऑनलाईन स्पर्धेस मोठा प्रतिसाद- अंकिता पाटील

शिवजन्मोत्सव ऑनलाईन स्पर्धेस मोठा प्रतिसाद- अंकिता पाटील

इंदापूर 06 // शिवजयंती निमित्त जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या वतीने शिवजन्मोत्सव ऑनलाईन स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना दि.5 मार्च रोजी इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्या व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या कार्याध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गौरव करून त्यांना सन्मानीत करण्यात आले. या ऑनलाईन स्पर्धेमध्ये 1371 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

अंकिता पाटील यांच्या संकल्पनेतून 'शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात"साजरी व्हावी या उद्देशाने तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर  स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले.स्पर्धेत सहभागी व्यक्‍तींनी शिवछत्रपतींच्या कार्याची ओळख करून देणारी वेशभूषा, रांगोळी, स्व:ता काढलेले चित्र, लाईट डेकोरेशन, गडकिल्ले प्रतिकृती, गीत गायन, शिववंदना यांचा व आपल्या नव कल्पनांचा समावेश करून  व्हाट्सअप च्या माध्यमातून शिवजयंती उत्सवाचे , २ ते ३ मिनिटांचे व्हिडिओ किंवा फोटो अपलोड करायचे होते.

भाषण- छोटा गट प्रथम क्रमांक- कु. अक्षरा बाबुराव जाधव खोरोची, द्वितीय क्रमांक- चि.शौर्य अमरसिंह वाबळे पाटील शेटफळगडे, तृतीय क्रमांक' कु. देवयानी दत्तात्रय देवकर बावडा, उत्तेजनार्थ - चि. रुद्रप्रताप किशोर काजळे निरगुडे, चि. रितेश रमेश देशमुख, सिद्धराज कांतीलाल सकुंडे तावशी, कु. प्रेरणा संदीप शिंदे मदनवाडी, भाषण मोठा गट- कु. अंकिता तात्यासाहेब सावंत कुरवली, कु. शिवानी सचिन सपकाळ सपकळवाडी, कु. श्रद्धा राजेंद्र तुपे बावडा.

रांगोळी स्पर्धा- प्रथम क्रमांक चि. लखन मोहन डिसले गिरवी, द्वितीय क्रमांक कु. सोनाली राहुल गोरे, तृतीय क्रमांक कु. ऋतुजा संतोष पोतदार बावडा

सजावट स्पर्धा- प्रथम क्रमांक चि. यशराज अनिल कदम पाटील खोरोची, द्वितीय क्रमांक चि.आकाश देशमुख भिगवन, तृतीय क्रमांक कु. सुशीला पांडुरंग सुपूते शेळगाव

चित्रकला स्पर्धा- प्रथम क्रमांक कु. कोमल काकासो गायकवाड बोराटवाडी, द्वितीय क्रमांक कु. शिवानी हनुमंत निंबाळकर सणसर, तृतीय क्रमांक चि. तनिष्क तात्यासाहेब माने पळसदेव,कु. शिवानी शिंदे, चि. शिवम शिंदे, चि. वेदांत शिंदे तसेच चि. प्रतीक घोगरे व समीर मनेरी बावडा यांना उत्कृष्ट सहभागाबद्दल गौरविण्यात आले.

महिला सबलीकरणाचा दृष्टिकोन समोर ठेवून जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या वतीने युवती सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम घेतले जातात. दरवर्षी शिवजन्मोत्सव निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. कोरोना पार्श्वभूमीवर देखील ऑनलाइन स्पर्धेला मोठा सहभाग नोंदविला गेला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी यावेळी दिली.