मोठी बातमी | देशातील ऊस उत्पादकांसाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला !

मोठी बातमी | देशातील ऊस उत्पादकांसाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला !

नवी दिल्ली । देशात एकीकडे केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरून आंदोलन सुरू असून, दुसरीकडे मोदी सरकारने उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून होणारे उत्पन्न, तसेच सब्सिडीचा 5 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

यंदा देशात 310 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशाला 260 लाख टन साखर लागते. साखरेचे दर कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने दोन्ही संकटात आहेत. यावर मात करण्यासाठी 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले. 

यंदा सरकारने 60 लाख टन साखरेच्या निर्यातीवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. यामध्ये 3500 कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसेच यातून मिळणारे 18000 कोटींचे उत्पन्न देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार आहेत, असे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.