कुगाव येथे वाळू चोरांना पकडले - १२ लाखाच्या बोटी नष्ट

कुगाव येथे वाळू चोरांना पकडले - १२ लाखाच्या बोटी नष्ट

करमाळा 07 (शितलकुमार मोटे) //  कुगाव (ता.करमाळा) येथे उजनी जलाशयात बेकायदेशीररित्या फायबर बोटीव्दारे वाळू चोरी करणाऱ्या पाच जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडील १२ लाखाच्या दोन फायबर बोटी व १ लाख २० हजार रूपयाची वाळू पाण्यात बुडवून नष्ट केल्या आहेत. 

यात पोलीस कॉन्स्टेबल सचिन शामसुंदर घुगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की कुगाव येथे उजनी जलाशयात दोन यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने वाळू चोरी होत असल्याची माहिती समजल्यावर (ता.५) पहाटे दोन वाजता तेथे छापा टाकला असता, नदीतील वाळू बेकायदेशीर उपसा करत असताना आढळून आले. त्यांच्याकडे १२ लाख रूपयाच्या दोन बोटी सापडल्या असून १ लाख २० हजार रूपयाची १२ ब्रास वाळू सापडली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी या बोटींचा व वाळूचा पंचनामा करून वाळूसह बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या आहेत. या प्रकरणी मफजुल शेख, महेबुब शेख, रफीकहुल शेख, माबूद शेख (सर्व रा.अकुलबना, झारखंड) तसेच पांडूरंग प्रल्हाद मोरे (रा.चिखलठाण, ता.करमाळा) व दुसऱ्या बोटीचे मालक हनुमंत रेडके (रा.कालठण नं.१, ता.इंदापूर) या सर्वांवर वाळू चोरी व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.जाधव हे करत आहेत.