ब्रेकिंग || भिगवण पोलिसांनी 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत ; वाचा काय आहे कारण

ब्रेकिंग || भिगवण पोलिसांनी 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत ; वाचा काय आहे कारण

भिगवण || सध्या कोरोना रोगाच्या महामारीचे अनुषंगाने  राज्य सरकार व केंद्र सरकार कोरोना रोगाचा प्रसार आटोक्यात आणणेकरीता आतोनात प्रयत्न करीत आहे. भिगवण परीसरात तसेच हद्दीत कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत असलेने जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख पुणे यांनी ३७(१)(३) जारी केलेले असताना याचा अवमान करून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने मित्रपरिवार जमा करुन वाढदिवस साजरा करणाऱ्या 30 ते 40 जणांवर भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भिगवण पोलीसांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमीनुसार सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई केल्याचे भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन माने यांनी सांगितले आहे.

दि.24 एप्रिल 2021 रोजी  रात्री 07 वाजताचे सुमारास  गणेश दत्तात्रय पवार रा.पोंधवडी भिगवण याचा वाढदिवस १८ ते २० लोकांनी त्याचे सह साजरा केला त्यामध्ये १) गणेश दत्तात्रय पवार २)संजय महादेव बंडगर ३) सौरभ गोरख बंडगर ४) सचिन दादा बंडगर ५) अक्षय पंढरीनाथ खारतोडे ६) अक्षय आगतराव पवार ७) भाउ सुभाष बंडगर ८) प्रदिप मधुकर बंडगर ९) अभिषेक ज्ञानदेव बंडगर १०) अजिंक्य कांतीलाल बंडगर ११) गणेश कोंडीबा पवार १२) गणेश दत्तात्रय बंडगर १३) नवनाथ दशरथ बंडगर १४) नारायण महादेव बंडगर १५) विजय सदाशिव बंडगर १६) शिवराज संभाजी बंडगर १७) निलेश दत्तात्रय बंडगर १८) संदिप बालु चंडगर १९) कुलदिप कांतीलाल बंडगर २०) 
भाउसो आप्पा बंडगर सर्व रा. पोंधवडी, भिगवण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर त्याच दिवशी 08  वा.चे सुमारास कुलदिप कांतीलाल बंडगर पोंधवडी, भिगवण यांचा वाढदिवस 13 ते 14 लोकांनी त्याचसह साजरा केला आहे त्यामध्ये १) कुलदिप कांतीलाल बंडगर स्वतः तसेच २) विजय सदाशिव बंडगर ३) प्रदिप मधुकर बंडगर ४) विठ्ठल भानुदास बंडगर ५) तुषार भानुदास बंडगर ६) सुरज भानुदास भोसले (७) निलेश दत्तात्रय बंडगर ८) अभिषेक ज्ञानदेव बंडगर ९) नारायण बापु बंडगर १०) मयुर लालासो बंडगर ११) अजिंक्य कांतीलाल बंडगर १२) दिगंबर भानुदास बंडगर १३) भास्कर जगन्नाथ बंडगर १४) पप्पु लालासो बंडगर यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शिवाय दि.29 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी ईश्वर शिवराम बंडगर रा.पोंधवडी, भिगवण याचा वाढदिवस ८ ते ९ लोकांनी त्यांचेसह साजरा केला असलेचे निष्पन्न झाले त्यामध्ये १) ईश्वर शिवराम बंडगर स्वतः तसेच २) प्रेम नाना बंडगर ३) दादा जालिंदर वाघरे ४) सचिन दादा बंडगर, ५) निलेश दत्तात्रय बंडगर ६) विठ्ठल भानुदास बंडगर ७) तुषार भानुदास बंडगर ८) विनोद नवनाथ बंडगर ९) मयुर लालासो बंडगर सर्व रा. पोंधवडी, भिगवण यांविरुध्द  जिल्हाधिकारी पुणे याचे आदेशाचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.