बनावट रेमडेसिव्हीरमुळे रुग्ण दगावल्याने चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बनावट रेमडेसिव्हीरमुळे रुग्ण दगावल्याने चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बारामती || बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बारामतीत समोर आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीसांनी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे राज्यात खळबळ उडाली असताना अशा प्रकारची बनावट औषध रुग्णांच्या जीवावर बेतलं असल्याचं समोर आलं आहे.

बारामती तालुका पोलिसांनी चौघांना अटक केली होती.…

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर औषध बनवून विकणाऱ्या चौघांना अटक केली होती. दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत आणि शंकर भिसे अशी आरोपींची नांवे आहेत.या चौघांनी बनावट रेमडिसीव्हर इंजेक्शन बनवून त्याची विक्री केली होती. बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत या चौघांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एकाचा या बनावट औषधामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. या चौघांवर पोलिसांनी कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.