भाजपच्या समाधान औताडेंकडून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा 3716 मतांनी पराभव ; राष्ट्रवादीला धक्का

भाजपच्या समाधान औताडेंकडून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा 3716 मतांनी पराभव ; राष्ट्रवादीला धक्का

पंढरपूर || अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. भगीरथ भालके यांचा निसटता पराभव झाला असून पहिल्या फेरीपासून ते 38 व्या फेरीपर्यंत त्यांनी प्रचंड टफ दिली आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादीसह भाजपने येथील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली होती. आता या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 7500 मतांनी समाधान औताडे विजयी झाले आहेत. अद्यापत याची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का…

पंढरपुरात अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार भगीरथ भालके यांना ३ हजार ७१६ मतांनी पराभूत केले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला आणि विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे करोना संसर्गाने निधन झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे आघाडीवर होते. मात्र काही फेऱ्यांनंतर भाजपचे उमेदवार यांनी समाधान औताडे यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि दणदणीत विजय मिळवला आहे.

भाजपकडून विजयोत्सव साजरा…

विजयानंतर पंढरपुरात कोरोना नियम केराच्या टोपलीत टाकल्याचे दिसत आहे. भाजपकडून विजयोत्सव साजरा केला जात आहे. समाधान औताडे यांची विजयी मिरवणूक काढलेल्याचे चित्र पंढरपुरात दिसत आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे येथे सध्या मतमोजणी केंद्रावर फक्त 14 टेबलच मांडण्यात आलेले होते. जमावबंदीचे आदेशही जारी करण्यात आले होते. मात्र विजयानंतर हे नियम पाळले नसल्याचे दिसत आहे.

भाजप उमेदवाराचा विजय म्हणजे राज्य सरकारला जनतेची चपराक ; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

सहानुभूती आणि खोटी आश्वासने यावर मतदान करणार नसल्याचे मतदारांनी सिद्ध केले आहे. रोजच्या जगण्यामध्ये तोंड द्यावे लागणाऱ्या वाढीव वीज बिल, वीज तोडणी, कर्जमाफीची अंमलबजावणी न होणे या मुद्द्यावर मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे येथील मतदारांनी एक जोरदार चपराक महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या विजयावर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर हल्लबोल केलाय.