इंदापूरात लवकरच होणार युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ; मुलाखत निवड प्रक्रिया ही पार पडली

इंदापूरात लवकरच होणार युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ;  मुलाखत निवड प्रक्रिया ही पार पडली

इंदापूर(देवा राखुंडे) ||  शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी व शिवसेनेचे विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती शासकीय विश्रामगृह इंदापूर येथे दिनांक २१ ऑगस्ट रोजी पार पडल्या. यावेळी अनेकांनी उपस्थिती लावली.

कोअर कमिटी सदस्य रुपेश कदम युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सूचनेनुसार इंदापूर तालुक्यातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी इंदापूर तालुक्यातील शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थिती लावली.शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पदाधिकारी मुलाखती या वेळी पार पडल्या.

यावेळी बोलताना सचिन इंगळे म्हणाले की तालुक्यातील वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख जिल्ह्यातील युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या सल्ल्यानुसार नवीन निवडी पार पडतील.आलेल्या सर्व युवासेना पदाधिकाऱ्यांचे स्वागत कुलदीप निंबाळकर, लक्ष्मण आसबे, सागर नरळे, विनायक लोंढे, किरण गोळे, योगेश हरिहर, दिपक हगारे, राजू हांगे, निखिल देवकर, अक्षय पवार यांनी केले.