भाटनिमगांवचे मुकेश साळुंके यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती

भाटनिमगांवचे मुकेश साळुंके यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती

इंदापूर || भाटनिमगाव येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मुकेश साहेबराव साळुंके यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे.त्याचे पत्र तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांनी दिले आहे.

युवक कॉग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते मुकेश साळुंके यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घरोघरी पोहोचणार असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे संघटन करुन पक्ष वाढीचे प्रयत्न करणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,तालुकाध्यक्ष अँड. शुभम निंबाळकर,कार्याध्यक्ष सचिन खामगळ,मनोहर भोसले, नानासाहेब भोसले, सतीश खबाले,श्रीमंत खबाले, बाळासाहेब गायकवाड, आकाश गायकवाड,समाधान भोसले,अनिल पवार,अतुल शिंदे,अभिनंदन साळुंके,किरण शिंदे उपस्थित होते.