ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

इंदापूर || ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने लोकशाहीर काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच रविंद्र पाटील व उपसरपंच तेजमाला बाबर यांनी प्रतिमेचे पूजन केले.यावेळी किसन सरडे,बाळू गिरी,विजय सोनवणे, उल्हास पाटील,नागनाथ कसबे,दशरथ बाबर,रेखा बाबर, कोंडाबाई जाधव, ग्रामसेविका स्वाती चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरपंच पाटील म्हणाले की,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक आणि साहित्यिक चळवळीतील योगदान मोलाचे आहे.अण्णाभाऊ साठे यांच्या कथा आणि कादबंर्‍यांमधून सामान्य माणसाच्या व्यथा मांडलेल्या दिसून येतात.त्यांच्या साहित्याचे वाचन तरूणांनी गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले. आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष बाबर आणि राजू मदने यांनी प्रयत्न केले.