अण्णाभाऊ साठेंचा दृष्टीकोण मानवतावादी होता - ॲड.समीर मखरे

अण्णाभाऊ साठेंचा दृष्टीकोण मानवतावादी होता - ॲड.समीर मखरे

इंदापूर || अण्णाभाऊ साठेंचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत अण्णाभाऊंच्या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरले आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याने उपेक्षित, वंचित, कष्टकऱ्यांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंचा दृष्टीकोन मानवतावादी होता.असे प्रतिपादन संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी केले,ते अण्णा भाऊंच्या जयंतीदिनी बोलत होते.

समाजव्यवस्थेने माणसामाणसात निर्माण केलेली दरी अण्णांभाऊंनी अचूक हेरली होती. त्यांच्या मनावर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता.असे ॲड.समीर मखरे यांनी शेवटी नमूद केले.

मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने भिमाई आश्रमशाळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य गोरख तिकोटे यांनी अभिवादन केले. यावेळी संस्थेतील सर्व विभागाचे प्रमुख, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्यक्रमस्थळी दक्षता घेण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले.