अ.भा.वि.परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने परिषद की पाठशाला या उपक्रमास सुरवात ; पडस्थळ गावी दिले शिक्षणाचे धडे

अ.भा.वि.परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने परिषद की पाठशाला या उपक्रमास सुरवात ; पडस्थळ गावी दिले शिक्षणाचे धडे

इंदापूर || "शिक्षार्थ परिषद - सेवार्थ परिषद" हे ब्रीद घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही कोविड-१९ च्या काळात सध्या काम करतेय. कोरोना व्हायरस मुळे अद्यापही शाळांना टाळे आहे. त्यामुळे मुलांची शिक्षणासाठी वाताहात होतेय.विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी 1 जुलै ते 8 जुलै च्या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने "परिषद की पाठशाला" हा उपक्रम राबवण्यात येतोय.

इंदापूर मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. गुरुवारी दि.1 जुलै रोजी तालुक्यातील पडस्थळ या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी ससंवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी करित उजळणी,पाढे,छान छान गोष्टी,बेरीज वजाबाकी,आठवड्याचे वार,यांशिवाय इंग्रजी शिक्षण आदी बाबतील परिषदेच्या सदस्यांनी हितगूज केली.यावेळी शाळेतील शिक्षक रमेश जाधव, इंदापूर सहमंत्री अवधूत बाचल, दीपक जमदाडे,प्रथमेश पिसे आदींसह 40 ते 45 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.