दिलासादायक || इंदापूर तालुक्यातील 331 नागरिकांची कोरोनावर यशस्वी मात तहसीलदार अनिल ठोंबरे यांची माहिती

दिलासादायक || इंदापूर तालुक्यातील 331 नागरिकांची कोरोनावर यशस्वी मात तहसीलदार अनिल ठोंबरे यांची माहिती

इंदापूर || तालुक्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले असून कोरोनाची चाचणी बाधित आल्यानंतर उपचार घेत असलेल्या 331 नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे मंगळवारी दि.04 रोजी त्यांना घरी सोडण्यात आले. यात ग्रामीण भागातील 277 व शहरातील 54 व्यक्तींचा समावेश आहे.दरम्यान मंगळवारी कोरोनामुळे चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोणतीही लक्षणे जानवत असल्यास नागरिकांनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केले आहे.

इंदापूर तालुक्यात कोरोना वाढीचा वेग मंदावला असल्याचे सध्या दिसून येत आहे. मंगळवारी दि.04 रोजी तपासणी करण्यात आलेल्यांपैकी 172 नागरिकांचा चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. यात ग्रामीण भागातील 152 तर शहरातील 20 रुग्णांचा समावेश आहे. सध्या कोरोनावर उपचार घेत असणाऱ्या नागरिकांची संख्या 2463 इतकी असून आजपर्यंत कोरोनामुळे 249 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यात ज्या पटीत कोरोनाची रुग्ण वाढत होती,सध्या ती काही प्रमाणात ओसरली असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने लाॅकडाऊन चे निर्बंध वाढवल्यानंतर आता याचा काही अंशी परिणाम दिसून येतोय. हळू हळू राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताना दिसून येतेय.त्यामुलके सहाजिकच ही परिस्थिती राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास ही मदत होईल. मात्र ही परिस्थिती आटोक्यात आनण्यासाठी नागरिकांनी राज्य सरकार व यंत्रणेला त्याच पटीत सहकार्य देखील करावे लागेल.