पंढरपूर प्रशासनाला सुतासारखे सरळ करणार - अभिजीत बिचकुलेंची पंढरपूर पोटनिवडणूकीत उडी

पंढरपूर प्रशासनाला सुतासारखे सरळ करणार - अभिजीत बिचकुलेंची पंढरपूर पोटनिवडणूकीत उडी

पंढरपूर || पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक लढवण्याचे कारण की,महाविकास आघाडीचे तुनही लोक जे एकत्र आले आहेत ते कर्तव्यशून्य लोक आहेत.दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरळ सरळ सांगितले आहे की अधिकारी ऐकत नाहीत, मी शंभर वेळा सांगून दमलो आहे की मला विधान भवनात येऊ द्या ह्यांना सुतासारखे सरळ करतो. पंढरपूर मध्ये मी माऊलीच्या रुपात येऊन "तंटा नाय तर,घंटा नाय" या प्रशासनाला सुतासारखे नाय सरळ केले तर बोला.काँग्रेस मधील एका मंत्र्याने आपल्याशी गद्दारी केल्याने आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे उमेदवार अभिजीत बिचकुले यांनी सांगितले आहे.

एकेकाळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही खुलेआम आव्हान देण्याचं धाडस करणारा व शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार्‍या अभिचित बिचकुले यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले आहे. सातारच्या अभिजित बिचुकले यांनी आता पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिजित बिचुकले यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूर पोट निवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार आहे