दोन-तीन पळाले मात्र एक सापडला ; सरडेवाडी येथील लोंढे वस्तीवर घडली घटना

दोन-तीन पळाले मात्र एक सापडला ; सरडेवाडी येथील लोंढे वस्तीवर घडली घटना

इंदापूर || लाॅकडाऊन लागू करण्यात आल्यापासून खेडोपाडी चोरीच्या घटना वाढत चालल्या असून मागील सप्ताहात कांदलगांव मध्ये चोर आले चोर आले असा बोभाटा उठला होता. शुक्रवारी दि.21 रोजी पहाटे मात्र इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावच्या हद्दीतील लोंढे वस्ती वरील नागरिकांनी एका चोरट्याला पकडून इंदापूर पोलीसांच्या ताब्यात दिले. 

गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे या दरम्यान हा सरडेवाडी शहा परिसरात विविध ठिकाणी हा चोरीचा प्रकार घडला. सरडेवाडी परिसरातील निकम वस्तीवर रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान चोरी झाली.यात अजिनाथ निकम व राजू जाधव यांचा मोबाईल शिवाय मोठा ऐवज चोरट्यांच्या हाती काही लागला नाही. त्यानंतर हे चोरटे शहा गावातील देवकातेवस्ती कडे घुसले. या परिसरातील आबा देवकाते यांच्या घरी रात्री 1 च्या दरम्यान चोरी करण्याचा प्रयत्न केला,मात्र आबा देवकाते जागे झाल्याने चोरट्यांचा डाव फसला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा पुन्हा सरडेवाडी परिसरातील लोंढे वस्तीकडे वळवला. 

रात्री दिड च्या दरम्यान लोंढे वस्ती वरील विजय भारत जाधव यांच्या घरात हे चोर घुसले.जाधव यांच्या आई जाग्या झाल्या त्यांना शंका आली म्हणून त्यांनी विचारणा करत आरडाओरड केली. या गोंधळाने विजय जाधव व त्यांचे नातलग गोविंद लोंढे,बंडू लोंढे,संतोष लोंढे,शंकर लोंढे जागे झाले. हे पाहून असता चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यापैकी एका अज्ञात चोरट्याला पकडण्यात यश लोंढे वस्तीवरील नागरिकांना आले.थोडीशी मालीश केल्यानंतर या अज्ञात चोरट्याने आपण इंदापूर शहरातील सरस्वती नगरचा असल्याचा असल्याची कबुली दिली. 

यानंतर इंदापूर पोलिस ठाण्यास संपर्क साधला व घडलेला प्रकार कळवला. तात्काळ इंदापूर पोलिस लोंढे वस्तीवर दाखल झाले, पकडलेल्या चोरास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.जाधव यांचा घरातून रोख स्वरुपात 14 हजार 770 रूपये चोरीस गेले असून इंदापूर पोलीसात रितसर तक्रार देणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान एक धारदार चालू,बॅटरी,घड्याळ या वस्तू मिळून आल्या आहेत.