अनावश्यक खर्च टाळून लोढा परिवाराने पुरवले 300 डबे ; कोवीड काळात मदतीचा हात

अनावश्यक खर्च टाळून लोढा परिवाराने पुरवले 300 डबे ; कोवीड काळात मदतीचा हात

इंदापूर || सध्या कोरोनाचा काळ असल्याने लाॅकडाऊन लावण्यात आलाय. इंदापूर मध्ये 17 मे पर्यंत याची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून दवाखाने व मेडिकल सेवा व्यक्तिरिक्त सर्व काही ठप्प आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालय व इतर खाजगी रूग्णालयात शेकडो कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यांच्या नातलगांची जेवनाची तारांबळ लक्षात घेऊन इंदापूर मधील धरमचंद लोढा यांनी आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून सर्व इतर खर्चाला फाटा देत या रूग्णालयात स्वादिष्ट जेवणाचे तब्बल 300 डबे वाटप केलेत.

कोरोना काळात अनाठाई खर्च नको म्हणतं लोढा परिवाराने आपल्यातील माणुसकी दाखवून देत हे नातं अधिक घट्ट केलेयं. याचसोबत या सर्व रूग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका,आरोग्य कर्मचारी यांचा गुलाबपुष्प,मास्क व स्वादिष्ट जेवण देऊन यथोचित सन्मान केलाय. याचसोबत उपचार घेणाऱ्या रूग्णांना जेवण,पाणी बाॅटल व मास्क याच वाटप केलयं.लोढा परिवार एवढ्यावर थांबला नाही उपजिल्हा रूग्णालयात सेवा बजावणारे पुरुष कर्मचाऱ्यांना टी शर्ट वाटप करुन मायेचं पांघरूण घातलेय. 

मिळालेलं आयुष्य परमेश्वराची आणि समाजाची देणं समजून संकट काळात फुल ना फुलाची पाकळी मदत करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आज समाजाला प्रत्येकाकडून थोड्याफार मदतीची,आधाराची अपेक्षा आहे.यासाठी प्रत्येकाने आपापल्या ताकदीने दोन पाऊल पुढे येण्याची गरज असल्याने संस्थापक उपाध्यक्ष युवा क्रांती प्रतिष्ठानचे  धरमचंद लोढा यांनी म्हटलयं.

दरम्यान युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दशरथ भोंग व उपाध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या का सामाजिक कार्यक्रमात धरमचंद लोढा व इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष वसंत फलफले यांना पुष्पहार देऊन उदंड आयुष्याच्या शुबेच्छा देण्यात आल्या. यावेळी कोरोनाच्या सर्व नियमावलीचे पालनही करण्यात आले.